मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणा-या अभिनेत्री कंगना राणावतची पाठराखण केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे.मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे असे सांगतानाच कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्य सरकार वर टीका केली आहे असे आठवले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अभिनेत्री कंगना राणावतने ट्विट करीत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्थरातून तिच्यावर टीका केली जात आहे. तर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण केली आहे.लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे.मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्य सरकार वर टीका केली आहे.त्यामुळे टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे.कंगना राणावत यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे.तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल अशी भूमिका आठवले यांनी घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकार मध्ये सहभागी आहे.त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकार वर केलेली टीका असो याप्रकरणी कंगना वर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगना राणावत ला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील असा इशाराही आठवले यांनी दिला आहे.