खडसेंनी मला व्हिलन ठरवलं;यावर योग्य वेळी बोलणार

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद : भाजपला सोडचिठ्ठी देणारे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरल्यानंतर यावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही.योग्य वेळी यावर बोलणार असल्याचे सांगतानाच एकनाथ खडसे यांनी मला व्हिलन ठरलवं असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माझा भाजपवर रोष नाही, कोणत्याही केंद्रीय नेत्यावर नाराजी नाही.केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला हे दुर्दैव असून,माझ्याबद्दल त्यांची तक्रार होती तर त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली असती तर योग्य झाले असते.मात्र यामध्ये खडसे हे मला व्हिलन ठरवत आहेत असे सांगून खडसे हे अर्धसत्य सांगत आहेत असे फडणवीस म्हणाले.याबाबत आपण योग्य वेळी बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने याचा परिणाम काय होईल या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजप हा मोठा पक्ष आहे.कोणाच्या जाण्याने पक्ष थांबणार नाही.एवढेच काय जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम होणार नाही .खडसे यांनी राष्ट्रवादीच जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्यासोबत भाजपचा एकही आमदार जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावली.

Previous articleनुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्याची काँग्रेसची मागणी
Next articleखडसे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; १० ते १२ आमदार संपर्कात असल्याचा दावा