मुंबई नगरी टीम
मुंबई : अखेर भाजपात नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.यावेळी खडसे यांनी भाजप आणि नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.मी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर माझ्या पाठी ईडी लागेल असे बोलले जात होते मात्र मी आता त्यांच्या पाठी सीडी लावणार आहे,असे सांगतानाच,ज्या निष्ठेने मी भाजपात काम केले तसेच काम राष्ट्रवादीत करेन,नाथाभाऊची ताकद काय आहे,ही मी दाखवून देईल, अशा स्पष्ट इशारा खडसे यांनी भाजपाला दिला.
भाजपाला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.या वेळी काही निवडक खडसे समर्थकांना पक्षात प्रवेश देण्यात आला तर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.खडसे यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला.राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर तुमच्या पाठी ईडी लागेल असे म्हटले तर मी त्यांना म्हटले मी त्यांच्या मागे सीडी लावेन,नाथाभाऊने तुमच्यासाठी उभं आयुष्य दिलं,त्यामानाने तुम्ही काय केले,अँटी करप्शन,महिलेकडून आरोप, पवार साहेब मी शब्द देतो,जेवढं निष्ठेने काम मी भाजपात केले तसेच काम राष्ट्रवादीत करेन आणि नाथाभाऊची ताकद काय आहे, हे मी दाखवून देईल असा स्पष्ट इशारा खडसे यांनी भाजपला दिला.
४० वर्षे भाजपच्या उभारणीसाठी मी काम केले.४० वर्ष काम केल्यानंतर पक्ष सोडावासा वाटलं नाही पण विधानसभेवेळी माझी किती मानहानी झाली हे सर्वांनी पाहिली.माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले.याबाबत मी सभागृत अनेकदा याबद्दल विचारणा केली.खूप संघर्ष केला,मंत्रिमंडळातही संघर्ष केला.संघर्ष करणे हा माझा स्थायी स्वभाव आहे. उत्तर महाराष्ट्रात मी सातत्याने ५ जागा भाजपच्या निवडून आणल्या.मी समोरासमोर लढलो पण एकमेंबाबत द्वेषाची भावना केली नाही.पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम कधी केले नाही.इतक्या वर्षात मी महिलेला समोर ठेवून कधीही राजकारण केले नाही अशा शब्दात नाव न घेता त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.पवार साहेब शब्द देतो,जेवढं निष्ठेने काम मी भाजपात केले तसंच राष्ट्रवादीत करेन,दुप्पट पटीने पक्षाचा विस्तार करून दाखवेल. तुम्ही माझ्या पाठीशी भक्कम उभे राहिल्यावर मला कोणाची भीती नाही असेही खडसे यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांची इच्छा होती मी राष्ट्रवादीत जावे,केवळ कार्यकर्ते नाही तर दिल्लीतील वरिष्ठांनी देखील राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला असा गौप्यस्फोट यावेळी खडसे यांनी केला.मी जेव्हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा दिल्लीवरून मला फोन आला,तुम्हाला काहीतरी मिळेल.पण मी म्हटलं मला सर्व मिळेल,पण मला छळलं त्याचं काय? मी भूखंड घेतले असे म्हटले,दोन वेळा माझ्यामागे अँटी करप्शन लावले असा सांगतानाच कोणी किती भूखंड घेतले ते दाखवतो असा इशारा त्यांनी यावेळी दिला.माझी चार वर्ष वाया घालवली,पवार साहेब मी तुमचा अत्यंत आभारी आहे.अनेकजण मला म्हणाले तुम्ही राष्ट्रवादीला शिव्या शाप देता, आणि तिथेच जाता.तुम्हाला भाजपने सर्वकाही दिले आणि तुम्ही पक्ष सोडून जाता असाही आरोप करण्यात आला मात्र सकाळी पाच वाजता तुम्ही मिटिंग घेतली ती नीतिमत्ता का ? तुम्हाला सकाळी ५ वाजता राष्ट्रवादी चांगली वाटली असा टोला लगावत ,मला आता वाटली असे खडसे म्हणाले.यापुढे राष्ट्रवादीचे बळ वाढेल, यासाठी मी काम करेन असा विश्वास व्यक्त करतानाच तुम्हाला वर्ष भरात नक्की बदल दिसेल,नाथाभाऊची ताकद काय आहे, ही मी दाखवून देईल असेही खडसे यांनी सांगून,मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने माझ्या डोक्यावरचं ओझं गेल्यासारखं झालं असेही खडसे म्हणाले.