हिंदू सणांआड कुणी येईल तर शिवसेना सहन करणार नाही

हिंदू सणांआड कुणी येईल तर शिवसेना सहन करणार नाही
उद्धव ठाकरे कडाडले
मुंबई, दि. ११ पंचांग फाडून टाका, सण उत्सव थोतांड बंद करा, हेच आदेश येणं बाकी आहे. तेही काढा हवं तर; आधीच आपल्या सणांची रया गेली आहे. पण या शांततेचा अतिरेक झला तर एकदिवस असंतोषाचा स्फोट होईल, असा संताप व्यक्त करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांआड कुणी येत असेल तर शिवसेना सहन करणार नाही, असा जोरदार इशारा दिला.
ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने ध्वनिप्रदूषण होते म्हणून फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. मेट्रो ३ प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले उद्धव ठाकरे यांना फटाक्यांविषयीच्या निर्णयाबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला.    हिंदू सणांबाबतच असे निर्णय होणार असतील. तर पंचागच फाडून टाकण्याचे आदेश काढा. म्हणजे सणही साजरे होणार नाहीत आणि फटाकेही वाजणार नाहीत. हिंदू सणांबाबत होणारा हा अतिरेक शिवसेना  सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Previous articleमुख्यमंत्री स्वीडनच्या दौऱ्यावर
Next articleनांदेडचा निकाल भाजपची लाट ओसरल्याची नांदी