कोरोना फक्त मंदिरातच होईल का ? मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सरकारने नुकतेच थिएटर्स, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्सला उघडण्याची परवानगी दिली आहे.यावरून मनसेने पुन्हा एकदा मंदिरांचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पुनःश्च हरी ओम असे म्हणता आणि हरीलाच कोंडून ठेवता ? असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला केला आहे.मंदिरे खुली करण्याचा मुद्दा हा केवळ भावनेचा नसून हजारो व्यावसायिकांच्या रोजगाराचा देखील आहे, असे त्यांनी म्हटले. या संदर्भात यांनी ट्विट केले आहे.

“पुनःश्च हरी ओम म्हणता व “हरी”लाच कोंडून ठेवता.बार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे”, असे ट्विट बाळा नांदगावकर यांनी केले आहे. याधीही देखील मनसेने मंदिरांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला होता. अनलॉकच्या प्रक्रियेअंतर्गत सरकारने ५ नोव्हेंबरपासून थिएटर्स, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स आदींना ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच जलतरण तलाव आणि इनडोअर खेळांनाही संमती देण्यात आली आहे. मग मंदिरे अद्याप बंद का? असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे. मंदिरे खुली करण्याच्या मागणीवरून भाजपच्या आध्यत्मिक सेलने आज राज्यात आंदोलन पुकारले होते.

Previous articleअर्णब गोस्वामीसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करणारे आ.राम कदम समाज माध्यमात ट्रोल
Next articleफटाक्यांवर कायमची बंदी आणा,काँग्रेसची आदित्य ठाकरेंकडे मागणी