मुंबई नगरी टीम
मुंबई : एसटी कर्मचा-यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे कर्मचा-यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचा-यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे.तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे.त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करतानाच कर्मचा-यांचे थकित पगार दिवाळपूर्वी द्या अन्यथा भाजपाच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका एस.टी. कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या कंडक्टरने ठाकरे सरकारवर आरोप करत आत्महत्या केली.एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करतानाच कर्मचा-यांचे थकित पगार दिवाळपूर्वी द्या अन्यथा भाजपाच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून सरकारला जाब विचारला आहे.जळगावमधील मनोज चौधरी या एस.टी कंडक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. “वेतन न मिळाल्याने २ एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या.या अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणा-या घटना आहेत. एसटी कर्मचा-यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. दिवाळीच्या तोंडावर दोन कुटुंबे उघड्यावर आली आहेत,” असे सांगत फडणवीस यांनी हळहळ व्यक्त केली आहे.