वीज कर्मचा-यांना सानुग्रह तर एस.टी कर्मचा-यांना बोनस

 

मुंबई दि. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना ११ टक्के महागाई महागाई भत्ता तर अडीच हजार रूपये आणि अधिका-यांना ५ हजाराची दिवाळी भेटीची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली दुसरीकडे वीज महामंडळाच्या सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळें यांनी जाहीर केले. तसेच कंत्राटी कामगारांना ७ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
दिवाळी निमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिका-यांना महामंडळाच्यावतीन बोनस जाहिर करण्यात आला. कर्मचाऱ्यांना 11 टक्के महागाई भत्ता तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना 5 हजारांची दिवाळी भेटीची घोषमा महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची केली या निर्णयामुळे महामंडळावर १४० कोटीचा बोजा पडणार आहे.
नागपूर येथील बिजली नगर येथे ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तिनही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सर्वश्री सचिन ढोले, विनोद बोंन्द्रे आणि सुरज वाघमारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. ऊर्जामंत्री बावनकुळें यांनी घेतलेल्या या निर्णयामुळें वीज कर्मचा-यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Previous articleशाश्वत शेती, परवडणाऱ्या घरांसाठी स्वीडनमधील उद्योगसमुहांचे सहकार्य
Next articleविजबिलाची वसूली करून मतदार संघाचा विकास करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here