विजबिलाची वसूली करून मतदार संघाचा विकास करा

विजबिलाची वसूली करून मतदार संघाचा विकास करा
मुंबई दि. १३ दिवाळीच्या तोंडावर राज्यात सुरू असणा-या विद्युत भारनियमनावरून ऊर्जा विभाग टीकेचा धनी झाला आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे ग्रामीण क्षेत्रासह शहरी विभागातही भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. राज्यभरात विजेची बिले मोठ्या प्रमाणावर थकली असल्याने ऊर्जा विभागाला आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून ऊर्जा विभागाने नवी शक्कल लढविली आहे. आपल्या मतदारसंघातील थकीत वीजबिले वसुली करण्यासाठी आता स्थानीय आमदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. आपल्या मतदारसंघातून आमदारांनी विजबिलाची वसुली केल्यानंतर मतदारसंघात ऊर्जा विभागाशी संबंधित विकासकामे करून देण्याचे अमिष ऊर्जा विभागाकडून देण्यात आले असल्याची माहिती ऊर्जा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
राज्यात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या साथीला भारनियमनाची समस्या देखील वाढली आहे. साठवणुकीच्या कमी क्षमतेमुळे अधिकचा कोळसा घेऊ शकत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कोळशाचा तुटवडा झाला आहे. विजेची समस्या वाढली असल्याचे वीज वाचवण्याबाबत ऊर्जा विभागाकडून आवाहन देखील करण्यात आले आहे. यामध्ये वीज बिलाची वसुली होत नसल्याने वीज वितरण कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत परिणामी ऊर्जा विभागाशी संबंधित विकासकामे रखडली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous articleवीज कर्मचा-यांना सानुग्रह तर एस.टी कर्मचा-यांना बोनस
Next articleराज्यात दिवाळीत भारनियमन होणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here