नांदेडमध्ये काॅग्रेससोबत शिवसेना राष्ट्रवादीची हातमिळवणी
महसूलमंत्री पाटील यांची टिका
मुंबई दि 13, नांदेड काँग्रेसने जिंकली असेल पण संपूर्ण ग्रामीण व शहरी महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे कोणतेही मुद्दे चालले नाहीत. राष्ट्रवादी, एमआयएम आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी भाजपाला हरवण्यासाठी नांदेडमध्ये काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली अशी टिका महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की नांदेडमध्ये 35 टक्के संख्येने असणाऱ्या मुस्लीम मतदारांची मते अनेक वॉर्डात रातोरात कशी फिरली याचे विष्लेषण कधी तरी करावे. एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संख्याबळ शून्य झाले. त्याठिकाणी यापूर्वी राष्ट्रवादीचे 12 तर एमआयएमचे 11 नगरसेवक होते. शिवसेनेचे बारा नगरसेवक होते परंतु या निवडणूकीत त्यांची संख्या शून्य झाले. यापूर्वी भाजपाचे मात्र दोन नगरसेवक होते ते सहा विजयी झाले हे का लक्षात घेत नाही असा सवाल त्यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून आज रात्री परत येत असून त्या नंतर लगेचच शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल असा निर्णय होईल असे सांगत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमा त्यांच्या बँकखात्यांत थेट भरण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.
महसूलमंत्री पटील व महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज महसूल कर्माचाऱ्यांच्या संपात यशस्वी मध्यस्थी केली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर या कर्मचाऱ्यांनी आपला संप माग घेतला. महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आग्रह जरूर धरावा मात्र संप करुन जनतेला वेठीस धरू नये असा सल्ला त्यांनी यांनी कर्मचारी नेत्यांना दिला. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मगण्यांसाठी संप सुरु केला होता. अन्न व नागरी पुरवठा विभागात काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना डावलून त्या पदांसाठी थेट भरती करण्याला या कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध होता. त्यासाठी दिलेली भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी होती मात्र ती शासनाने मान्य केली नाही. सध्या ज्या पदांसाठी जाहिरात दिली आहे ती पदे सरळसेवेने भरलीच जातील असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र या पुढे सरळभरतीने पुरवठा अधिकाऱ्यांची भरती न करता महसूल कर्माचाऱ्यांमधूनच ती पदे भरली जातील. महसूल खात्यातील शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून तलाठी पदांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यासह अन्य काही मागण्या मान्य झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.