पैसे टाकून शिवसेनेकडून दळभद्री राजकारण, मी कधीच विसरणार नाही  राज ठाकरे

मुंबई दि.15 शिवसेना पैसे टाकून दळभद्री राजकारण खेळली, हे मी कधीच विसरणार नाही असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. बाळासाहेबांनी कधीच असे राजकारण शिकवले नाही. त्यांच्या नावावर गलिच्छ राजकारण सूरू आहे. याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

काल मनसेच्या मुंबईतील सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Previous articleचोरून फक्त छक्के घेऊन गेले,
Next articleडॉक्टरांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय – शरद पवार