दुसऱ्या टप्प्यातील 4 हजार 119 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 4 हजार 119 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. यात प्रमुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार उद्या 4,119 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार होते. मात्र, 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्राम पंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली नाहीत, तर काही ठिकाणी न्यायालयीन स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार नाही. त्यामुळे उद्या एकूण सुमारे 3,692 ग्रामपंचायतींसीठी मतदान होत आहे.
यामध्ये ठाणे- 14, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग-325, पुणे- 221, सोलापूर-192, सातारा- 319, सांगली-453, कोल्हापूर- 478, नागपूर-238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52,भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26 अशा एकूण 3692 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.
दरम्यान, नक्षलीग्रस्त गोंदियामध्येही निवडणूक होत असल्यानं, येथील संवेदनशील मतदानकेंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांसाठी बसेसची विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदानकेंद्रांवर मतदानाची केवळ सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहेत. तर इतर ठिकाणी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची होणार आहे.
गोंदियातील सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायतील नगरपरिषदेचा दर्जा देण्यासाठी गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.