मुंबई नगरी टीम
मुंबई : यूएईमधून आल्यावर नियमानुसार संस्थात्मक क्वारंटाईन न होता घरी गेल्यामुळे अभिनेता, सोहेल खान, अरबाज खान आणि त्याचा पुत्र निर्वाण खान या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, अरबाज, सोहेल आणि निर्वाण खान यांनी स्वतःला परदेशातून आल्यावर हॉटेल मध्ये क्वारंटाइन केल्याचं सांगितलं. परंतु असं न होता तेआपल्या घरी गेले, यामुळे पालिकेचा निष्काळजीपणा समोर आला. हा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या जीवाशी बेतेल याचं भान महापालिका आणि सरकारला आहे का? असा खरमरीत सवाल दरेकरांनी विचारला.
दरेकर म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासठी सरकार अनेक उपायोजना करत आहे. एका बाजूला सरकार सांगत आहे की, मुंबईत कर्फ्यु जाहीर करण्यात येतो. पण या सर्व बाबीतून सरकारचा सर्वसामान्य माणसांसाठी असलेला निष्काळजीपणा दिसून येत आहे, अशी टिका दरेकरांनी केली,
दरेकर पुढे म्हणाले, महानगरपालिका यांच्या कडे आहे. हेच राज्य सरकारचे नेतृत्व करतात. मग या प्रकारच्या गोष्टींकडे राज्य सरकार व महापालिकेचं लक्ष कसे नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. असा निष्काळीजपणा करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी व अश्या प्रकारचं दुर्लक्ष पुन्हा होणार नाही, याची हमी मुंबईकरांना देण्याची आवश्यकता आहे, असे दरेकरांनी त्यावेळी सांगितले.