चर्चा निष्फळ, एसटी कर्मचारी संपावर जाणार

मुंबई दि. १६ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने एसटीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. दिवाळीच्या सणामध्येच आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.वेतनवाढीबाबत राज्य शासन सकारात्मक असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या तीन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.या संपाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचारी संघटनांबरोबर चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या प्रश्नावर सन्मान्य तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीमध्ये एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विविध एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतील. समितीने चर्चा करुन वेतनवाढीबाबत सन्मान्य तोडगा सादर करावा, तो निश्चित मान्य केला जाईल. एसटी कामगारांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन निश्चितच सकारात्मक आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी कामगारांच्या वेतनात वाढ होणे गरजेचे आहे. यासाठी शासन सकारात्मक आहे. या कर्मचाऱ्यांना किती वेतनवाढ देणे शक्य होईल याबाबत विचारविनिमय करुन निर्णय घेण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. समितीमध्ये एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधीही असतील. एसटी महामंडळावर बोजा पडून ते अजून तोट्यात जाणार नाही यादृष्टीने तसेच कामगारांनाही चांगली पगारवाढ मिळेल यादृष्टीने विचारविनिमय करून समितीने सन्मान्य तोडगा काढावा. शासनामार्फत त्याला मान्यता दिली जाईल.एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेही गरजेचे आहे. त्यासाठी महामंडळाने विविध कल्पक स्त्रोत विकसीत करावेत. कर्मचारी संघटनांनीही याबाबत सूचना कराव्यात. शासनामार्फत त्यालाही निश्चित मान्यता देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक
Next article४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here