सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर नव्हे तर सिल्वर ओककडे

मुंबई नगरी टीम

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडीवर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी निशाणा साधला आहे.राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल आता मातोश्रीवर नसून तो सिल्वर ओककडे गेला आहे आणि हे सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चालवत आहेत असा घणाघात जानकर यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्य सरकारवर समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर टीकास्त्र सोडले आहे.राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल आता मातोश्रीवर नसून तो सिल्वर ओककडे गेला आहे आणि हे सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चालवत आहेत अशी टीका जानकर यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये आज राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा पार पडल्या या कार्यक्रमात जानकर यांनी सरकारवर निशाणा साधला.यापूर्वीच्या फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिलेले एक हजार कोटींचा निधी ठाकरे सरकारने द्यावेत, मराठा आणि धनगर आरक्षणांच्या प्रश्नावर न्यायालयाचा खर्च ठाकरे सरकारने उचलावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
ओबीसी समाजाच्या प्रश्नावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे जानकर म्हणाले. मराठा आणि ओबीसी तरुणांनी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी तोपर्यंत डोकी थंड ठेवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.भाजपने वीज बिल आंदोलनातून माघार घेतली पण किती दिवस भाजपच्याच पाठीवर बसू जायचे, कारण आपला पक्षही एक राष्ट्रीय पक्ष आहे त्याचेही अस्तित्व आहे असे सांगत त्यांनी भाजपावरील असलेली नाराजी पुन्हा एकदा दाखवून दिली.

Previous articleमहाराष्ट्रात मतपत्रिकेव्दारे मतदान ? विधानसभा अध्यक्षांनी कायदा करण्याच्या दिल्या सूचना
Next articleधनंजय मुंडेवर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने केला गंभीर आरोप ; आमरण उपोषणाचा दिला इशारा