मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईतील ट्रॅफिकची समस्येमुळे अनेकांना वेळेत कार्यालय गाठणे शक्य होत नाही याची प्रचिती मुंबईकरांना दररोज येत असतानाच याचा फटका आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही बसला आहे.मंत्रालयात पूर्वनियोजित बैठकीला पोहण्यासाठी रोहित पवार यांनी चक्क बुलेटचा अधार घेत मंत्रालय गाठले.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आज मुंबईतील आरेचं जंगल पाहण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांनी तिथं पर्यावरणप्रेमी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.’आरे बचाव’ आंदोलनातील कार्यकर्त्यांवर आधीच्या सरकारने दाखल केलेले आहेत.या कार्यकर्त्यांवरील असणारे गुन्हे राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार मागे घेतील,असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.तसेच यावेळी ‘आरे’तील रस्त्यावर फळं आणि रानमेवा विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत संवाद साधला.ऐवढेच नाही तर रोहित पवार यांनी आरेत चक्क रिक्षा चालवण्याचा आनंदही लुटला.
रोहित पवार यांनी या अगोदरही मुंबईतील रस्त्याचा प्रवास टाळत लोकलने प्रवास केला आहे.या आरेच्या भेटीनंतर त्यांना मंत्रालयातील नियोजित बैठकीला पोहचायचे होते.आरे जंगलाला भेट देऊन परत निघाले तेव्हा कार्यालयीन वेळ असल्याने रस्ते जाम होते.त्यामुळे या ट्रॅफिकमुळे मंत्रालयात पोहचणे अवघड होते.ट्रॅफिकमध्ये अडकल्यास मंत्रालयात पूर्वनियोजित बैठकीला वेळेत पोहचू की नाही अशी शंका त्यांना होती.म्हणून रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेहबूबभाई शेख यांच्या बुलेटने मंत्रालयापर्यंतचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.या बुलेटच्या प्रवासामुळे आपण लवकर मंत्रालयात पोहचू असा विचार करून पवार यांनी बुलेटवर प्रवास सुरू केला.मुंबईतील ट्रॅफिकचा अडथळा पार करत अखेर त्यांनी बुलेटवरून मंत्रालय गाठले.एवढेच नाही तर त्यांच्या बुलेटला मंत्रालयातही प्रवेश मिळाला.वेळेत मंत्रालय गाठल्याने रोहित पवार यांना दिलासा मिळालाच शिवाय प्रवासासाठी बुलेटचा सहारा मिळाल्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेहबूबभाई शेख यांच्यासोबत मंत्रालय परिसरात त्यांनी शेख सोबत फोटोही काढला.