ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी सरकार सकारात्मक

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील धुळे,नंदुरबार,नागपूर,अकोला,वाशिम,भंडारा,गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये,ओबीसी बांधवांच्या हिताचे रक्षण व्हावे,ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आव्हान देण्यासाठी यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता,दिल्लीतील वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यात येईल.विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बैठक आयोजित करुन पुढील कायदेशीर व्यूहरचना निश्चित करण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत नियम ५७ अन्वये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.राज्यात मंडल आयोग १९९४ पासून लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण लागू केले. ते आजपर्यंत कायम आहे. मुख्यमंत्री स्वत: याप्रकरणावर लक्ष ठेवून असून राज्य सरकार ओबीसी बांधवांचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleगुड न्यूज : दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार
Next articleमराठा समाजाच्या आरक्षणावरून चंद्रकांत पाटलांचा सरकारला गंभीर इशारा