लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी सकारात्मक
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि 21 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब मिळावा अशी मागणी केल्याबद्दल तसेच मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कायम साथ देत असल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांची मातंग समाजाच्या वतीने आभार आणि अभिनंदन करण्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समितीने बांद्रा येथे भेट घेतली .
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मुंबईत भव्य राष्ट्रीय स्मारक दादर येथील गुलमोहर मिल च्या जमिनीवर उभारावे तसेच या स्मारकासाठी शासनाने 1 हजार कोटींच्या निधीचीही तरतूद करावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने यावेळी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली . या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले . या शिष्टमंडळात डॉ प्रीतिष जळगावकर ; शंकर साठे ; महादेव गालफाडे ; नंदकुमार साठे ;दत्ता आव्हाड ; अतिष वाघमारे ; बाबळासाहेब उमप ; रमेश शेलार ; प्रदीप सूर्यवंशी ; रिपाइं चे सोना कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धिप्रमुख