तो कायदा राजस्थान अगोदर महाराष्ट्रात लागू

तो कायदा राजस्थान अगोदर महाराष्ट्रात लागू
नवाब मलिक यांची माहिती
मुंबई दि. २३ राजस्थान विधिमंडळात गुन्हेगारी कायदे (सुधारणा) विधेयक आणले जात आहे. या कायद्यानुसार सरकारी अधिकारी, न्यायाधीश, सचिव, आमदार, खासदार, मंत्री किंवा लोकसेवक यांच्याविरोधात सरकारच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. गुन्हेगारांना अभय देणारा हा कायदा असल्याचे म्हणत विरोधकांनी या कायद्याचा विरोध केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने हा कायदा यापूर्वीच पारीत केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
मलिक म्हणाले की, २०१६पासून हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. गुन्हेगारांना अभय देणारा हा कायदा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या कायद्याचा विरोध केला होता. मात्र सरकारने गोंधळात हा कायदा पारीत केला होता. हा कायदा भ्रष्ट मंत्री, भ्रष्ट अधिकारी, सरकारी यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या भ्रष्ट लोकांना संरक्षण देण्यासाठी आहे असा आरोपही मलिक यांनी केला. हे सरकार पारदर्शक असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात तर त्यांनी हा भ्रष्ट लोकांना संरक्षण देणारा हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी मलिक यांनी केली.
.

Previous articleपंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाला पिंजऱ्यात कैद असलेला पोपट बनवले 
Next articleएसीबी आणि ईडी कारवाई करणार