एसीबी आणि ईडी कारवाई करणार

एसीबी आणि ईडी कारवाई करणार

खा.किरिट सोमय्या

मुंबई दि. 23 मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देताना मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण घेवाण झाली आहे. या प्रकरणाची सर्व तपशीलवार माहिती एसीबी आणि ईडीला आज देण्यात आली असून, या यंत्रणा संबंधितांवर कारवाई करेल अशी अपेक्षा भाजपाचे खा. किरिट सोमय्या यांनी व्यक्त केली.
आज भाजपाचे खा. सोमय्या यांनी एसीबी आणि ईडी कार्यालयात जावून संबंधित अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देताना मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण घेवाण झाली असल्याची माहिती देत या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे सादर केले. या प्रकरणी निश्चितच संबंधितांवर कारवाई होईल अशी अपेक्षा खा.सोमय्या यांनी व्यक्त केली.

Previous articleतो कायदा राजस्थान अगोदर महाराष्ट्रात लागू
Next articleयंदापासून क्रीडा पत्रकारांना शिवछत्रपती पुरस्कार देणार