मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही,तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर । राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते करीत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही,तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूरच्या पाहणी दौ-यावर होते. शाहुपुरी येथे या दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाल्याने अनेक चर्चांना सुरूवात झाली.मात्र कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्याकडून केल्या जाणा-या पॅकेजच्या मागणीसंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले असता ” मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे,असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला.मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांची पत्रकार परिषद कोल्हापूरात झाली. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर पलटवार केला.मुख्यमंत्री बोलले त्याला हरकत नाही,त्याला पॅकेज म्हणा किंवा मदत,पण त्याची घोषणा करा, सर्वसामान्य जनतेला मदत मिळण्याशी मतलब आहे अशा शब्दात फडणवीसांनी मपख्यमंत्र्यांच्या टीकेवर प्रहार केला.नुकसान झाल्यावर सरकारने तातडीने मदत जाहीर करायला हवी होती पण अद्याप त्यांनी केली नाही.२०१९ मध्ये रोखीने मदत करण्यात आली होती.मदतीसाठी उशीर झाला असला तरी सरकारने ती मदत करावी असेही फडणवीस म्हणाले.

Previous article…तरच मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा सार्थकी लागेल ! मुख्यमंत्र्यांना दरेकरांचा टोला
Next article५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी