स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक चांगला

स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक चांगला

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

अमरावती दि.23  राज्याच्या हिताचा कोणताही  विषय असेल तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे स्वतः फोन करुन सांगतात आणि उपाययोजना सुचवतात. असा दिलदारपणा असावा असे सांगतानाच स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक हा अत्यंत चांगला असतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे टोला सत्तेत सहभागी असणा-या शिवसेनेला लगावला.

राज्याच्या हिताची कोणतीही बाब असेल तर शरद पवार यांनी मतांची चिंता कधीच केली नाही. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुका दुरुस्त करणारे  पवारच आहेत, असा उल्लेख करत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज  तोंडभरुन कौतुक केले.अमरावती मध्ये आज  शरद पवार यांचा  सर्वपक्षीय जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

भारताच्या राजकारणामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणारे कमी नेते आहेत.  पवार त्यामधिल एक आहेत. राजकीय पक्षांमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. पवार यांच्याशी राजकीय मतभेद असतील, पण राज्याच्या हिताचा विषय असेल तर ते स्वतःहुन फोन करुन सांगतात. उपाययोजना सुचवतात. हा दिलदारपणा असावा. स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक हा अत्यंत चांगला असतो, तशा प्रकारचे दिलदार विरोधक पवार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र माझ्या वाक्याचा  चुकीचा अर्थ लावू नका, असेही मुख्यमंत्री  सांगायला  विसरले नाहीत.

Previous articleयंदापासून क्रीडा पत्रकारांना शिवछत्रपती पुरस्कार देणार
Next articleएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती