कुलगुरू डाॅ. संजय देशमुख यांची उचलबांगडी
मुंबई, दि. २४ मुंबई विद्यापीठाच्या निकालास बेजबाबदारपणा दाखवल्याच्या कारणास्तव मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी उचलबांगडी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या वर्षीच्या शेक्षणिक सत्रात घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या ऑनलाईन पद्धतीची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यातही अपयशी ठरल्याचा आणि वेळेत निकाल घोषित न केल्याचा ठपका कुलगुरू डाॅ.देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला होता.वेळेत निकाल न लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे. परीक्षांचे निकाल कालबद्ध पद्धतीने लावावेत म्हणून राज्यपालांनी स्वतः पुढाकार घेऊन डॉ. देशमुख यांना ठराविक मुदत दिली होती. परंतु मुदत वेळोवेळी वाढवण्यातही येवूनही अपेक्षित वेळेत निकाल लागले नसल्याच्या कारणास्तव कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवून त् कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरूंकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता.