तावडे यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करा

तावडे यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करा

नवाब मलिक यांची मागणी

मुंबई दि. २५ मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले डाॅ. संजय देशमुख यांच्यावर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची जबाबदारी टाकून पळवाट काढून चालणार नसून, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण खात्याची असल्याने या खात्याचे मंत्री विनोद तावडे यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली आहे.

तावडे यांची मंत्रिपदावर राहण्याची क्षमता नाही. भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले त्यामुळे हकालपट्टी करण्यात आलेले कुलगुरू यांच्यावर जबाबदारी ढकलून पळवाट काढता येणार नसल्याने उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करावी अशी मागणी करतानाच, तावडे यांना यापदावर राहण्याचा अधिकारच नाही असेही मलिक म्हणाले.

Previous articleकर्जमाफीच्या यादीत सावळागोंधळ
Next articleउद्यापासून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होणार