उद्यापासून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होणार

उद्यापासून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होणार

सहकार मंत्री सुभाष देशमुख

मुंबई दि. २५ शेतक-यांना देण्यात येणा-या कर्जमाफीची सुमारे ८ लाख ४ हजार पत्र लाभार्थ्यांची यादी तयार होती. परंतु दिवाळीच्या सलग दिवस सलग सुट्ट्या आल्याने शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास उशीर झाल्याचाचे सांगतानाच उद्यापासून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होईल असा दावा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला.

लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती बॅकेत आली आहे. पण तिथे काही समस्या समोर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड नंबर एकच आहेत. पती , पत्नी यांचे एकच आधार क्रमांक आढळून आले. म्हणूनच आज बैठक घेतली गेली.

माहिती आणि तंत्रज्ञान विभाग आणि बँक यांना ज्या तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि उपस्थित झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. उद्यापासून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा दावाही त्यांनी केला.

जनतेचा पैसा असल्याने घाई गडबड न होऊ देता हे वाटप करण्यात येईल. ज्या चुका आधीच्या कर्जमाफीच्या वेळी झाल्या होत्या त्या होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.आधार कार्ड नंबर वगैरे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबाबत कारवाई होण्यापेक्षा बँकांकडून आलेली माहिती तपासू, योग्य निदान करू. शेतक-यांनी चुकीची माहिती दिलेली नाही. बँकांकडून आलेल्या माहितीत चुका होत्या असेही त्यांनी स्पष्ट केले.कर्जमाफीची घाई केल्याने चुका झाल्या असेही त्यांनी यावेळी मान्य केले.
गेल्या ४० वर्षांची खाती आहेत. एवढे मोठे काम करतांना चुका होणारच, मात्र जनतेचा पैसा वाया जाऊ देणार नाही असेही शेवटी देशमुख यांनी सांगितले.

Previous articleतावडे यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करा
Next articleआम्ही शिवसेनेतच , अफवांवर विश्वास ठेवू नका