नोटाबंदी नंतर सेकर रेड्डीकडे एवढा पैसा आला कसा ? –

मुंबई दि.२६ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पैसे बदलण्यासाठी देशातील जनता बॅकेच्या दारात उभी होती. संपूर्ण देश रांगेत उभा होता. परंतु पण एक महिन्याने कर्नाटक मधिल सेकर रेड्डीकडे दोन हजाराच्या नव्या ३३ कोटी ६० लाख रुपये सापडले. एवढा पैसा रेड्डी याच्याकडे कोठून आला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती वेळी राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे यांचा सवाल

या मुलाखतीत राज ठाकरे यांनी नोटाबंदी, अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन, भाजपाकडून होणारा पैशांचा वापर अशा अनेक मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय का घेतला हे त मला अजूनही समजलेले नाही. जुन्या नोटांमधील एकूण ९९ टक्के नोटा परत आल्या असे आरबीआय म्हणत असेल मग बनावट नोटा, काळा पैसा कुठे गेला नोटाबंदीचा काय उपयोग झाला असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Previous articleअमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस
Next articleशिवसेनेने सत्तेतुन बाहेर पडावं – अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here