शिवसेनेने सत्तेतुन बाहेर पडावं – अशोक चव्हाण

मुंबई दि.२६ सत्तेत असुनही शिवसेना दुटप्पी भूमिकेत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शांत बसायचे आणि बाहेर विरोध करायचा अशा शब्दात सेनेवर शाब्दिक हल्ला चढवत शिवसेनेने सत्तेतुन बाहेर पडावे अशी मागणी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

सरकारची तीन वर्षाची कामगिरी निराशाजनक असून, लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.

आज पासुन शेतक-याच्या खात्यावर पैसे जमा होतील असा दावा सरकारने केला होता. मात्र शेतक-यांच्या पदरी निराशाच पडली आहे. राज्यात सध्या सरकार नावाची चीज नाही .हे सरकार दररोज नविन नविन शासन निर्णय काढत आहे.अशी टिका करत २०१९ मध्ये देशात आणि राज्यात काॅग्रेसची सत्ता येईल असे चव्हाण यांनी सांगितले.

नोटबंदी मुळे लोकांना त्रास झाला देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नोटबंदी च्या निर्णयाला येत्या ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे त्यादिवशी काळा दिवस पाळण्यात येणार आहे.सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता होणार आहे.
कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ असून,शेतक-यांचा हाती काही लागले नाहीअटी शर्ती घालून शेतक-यांना कर्जमाफीतून वगळले असा आरोपही त्यांनी केला.

Previous articleनोटाबंदी नंतर सेकर रेड्डीकडे एवढा पैसा आला कसा ? –
Next articleमायावतींनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here