भाजप खा. नाना पटोले उध्दव ठाकरे यांची भेट घेणार

भाजप खा. नाना पटोले उध्दव ठाकरे यांची भेट घेणार

मुंबई दि. २५ भाजपचे नाराज खासदार नाना पटोले यांनी पुन्हा स्वपक्षावर निशाणा साधला आहे. भाजपात नाराज असलेल्या नेत्यांना एकत्रित आणून येत्या १५ नोंव्हेंबर रोजी पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती खा. नाना पटोले यांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफी आणि विविध प्रश्नावरून सरकारला घरचा आहेर देणारे भाजपचे खा.नाना पटोले उद्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याची भेट घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी भेटीची वेळ मागितली आहे. त्याचप्रमाणे खा.पटोले यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याही भेटीची वेळ मागितली आहे. काही दिवसांपूर्वी खा. पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते.

Previous articleमायावतींनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी
Next articleअखेर आजही कर्जमाफीची रक्कम जमा झालीच नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here