अखेर आजही कर्जमाफीची रक्कम जमा झालीच नाही
मुंबई, दि.२६ गुरूवार म्हणजे आज पासुन शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होईल हा सरकारचा दावा सपशेल फोल ठरल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही कर्जमाफीची रक्कम आज शेतक-यांच्या खात्यावर जमा झालीच नाही.काही तांत्रिक बाबींमुळे प्रत्यक्ष कर्जमाफीला उशीर होत असल्याने कर्जमाफीच्या प्रश्नावरून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची दमछाक झाली आहे. उद्यापासुन ( शुक्रवार) टप्या टप्याने शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असा दावा आता केला जात आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास अवधी लागणार असल्याचेही समजते.