राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा
रामदास आठवले
मुंबई दि.२८ आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काॅग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ” मी ब्राम्हण मुलीशी विवाह केला आहे” आता राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा,दलित समाजात आता त्यांच्या योग्यतेच्या मुली आहेत. दलित समाजाच्या कुटूंबात जाऊन जेवण करण्याचे नाटक त्यांनी बंद करावे असे आठवले म्हणाले ते आज अकोल्यात बोलत होते.
जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे असून, त्यासाठी प्रोत्साहनपर रकमेत भरीव वाढ केल्याचे आठवले यांनी सांगितले.अत्याचार कुठलाही पक्ष करीत नसतो.त्यामुळे भाजपच्या सत्तेत अत्याचार वाढले,असे म्हणणेही योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.