संजय निरूपम यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबई दि. २९ अखेर मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निरूपम यांच्या भाषणानंतर मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्याचे निरुपम यांनी समर्थन केले आहे. विनापरवानगी सभा घेऊन भाषण केल्यामुळे निरुपम यांच्या विरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळेच मनसेचे विभाग अध्यक्ष माळवदे यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेटीसाठी कांदिवलीतील ऑस्कर रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज ठाकरेंसोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरेही आहे. सुशांत माळवदे यांच्या प्रकृतीची विचारपूस राज ठाकरे यांनी केली. यानंतर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.