राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेना पाठिंब्याचा फेरविचार करणार
मुंबई दि.२९ काॅग्रेसला सोडचिठ्ठी देत रालोआ मध्ये सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिल्यास सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार करू, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे. तर शिवसेनेच्या संभाव्य हालचाली लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली त्यामुळे राजकिय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आला आहे.
सत्तेत असूनही अनेक प्रश्नावरून शिवसेनेने भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.तर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याच्या स्वप्नाला शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडत सुरूंग लावल्यानंतर या दोन पक्षातील अंतर वाढतच चालले आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता असून,
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिल्यास सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार करू, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निरोप पोहचवला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या इशा-याला डावलून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास सेना भाजप सरकारचा पाठिंबा काढू शकतात या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली आहे.
तर दुसरीकडे माजी महसूलमंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.