रामदास आठवले लोकसभेची निवडणूक लढविणार
मुंबई दि.३० भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलो असलाे तरी अागामी लाेकसभा निवडणूक लढविणार असून, शिर्डी, लातूर किंवा पंढरपूर या अारक्षित मतदारसंघातील एका जागेवर निवडणूक लढणार असल्याचे संकेत देत रिपाइंसाठी या तिन्ही पैकी दोन जागेची मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे करणार असल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी दिली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री अाठवले म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपने अाम्हाला निवडून येणाऱ्या आणि आरक्षित असलेल्या जागा द्याव्यात. गेल्या निवडणूकी प्रमाणे सातारा लोकसभेची जागा यावेळी आम्ही घेणार नाही. लोकसभेच्या दोन जागा निवडून अाल्यास अामच्या पक्षाला अधिकृत मान्यता मिळेल. राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना अाठवले म्हणाले, ‘शिवसेना-भाजपने आगामी लोकसभा निवडणूक युती करून लढवाव्यात. मात्र त्यांनी विधानसभा स्वबळावर लढविल्या तरी काही हरकत नाही.असे आठवले यांनी स्पष्ट करत आगामी लोकसभा निवडणूकीत रिपाइंला किमान दोन जागा द्याव्यात अशी मागणी केली.