आ.नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली
नितेश राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई दि.३० माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला असताना नारायण राणे यांचे पुत्र आणि काॅग्रेसचे आमदार नितेश राणेंनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एनडीए प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढील आठवड्यात होणा-या मंत्रिमंडळात त्याचे स्थान नक्की मानले जात आहे. कालच शिवसेनेने राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशाला कडाडून विरोध केला असतानाच काँग्रेस आमदार आणि राणेंचे पुत्र नितेश राणेंनी आज ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून सुमारे अर्धा तास चर्चा केल्याने अनेक चर्चांना ऊत आला आहे. आ. नितेश राणे यांनी आजच्या भेटीत कोकणात झालेल्या परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देवून , याचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतक-यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज राणे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे अशांना मंत्रिमंडळात कसे घेता असा सवाल भाजपला केला आहे.