आमदार खासदारांना सन्मानाची वागणूक न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई
मुंबई दि. ३० आमदार आणि खासदारांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्यासंदर्भात दोन वर्षापूर्वी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाची काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने राज्य सरकारच्यावतीने पुन्हा परिपत्रक जारी करण्यात येवून याचे उल्लंघन करणा-यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
लोक प्रतिनिधींना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्यासंदर्भात दोन वर्षापूर्वी मार्गदर्शक सूचना देवूनही यांचे काटोकोरपणे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य सरकारने पुन्हा परिपत्रक जारी करून सूचना केल्या आहेत. लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणा-या पत्र व्यवहारासंदर्भात विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याबाबतच्या सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्याचे बजावण्यात येवून याचे उल्लंघन करणा-यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे.