मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची आवृत्ती

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची आवृत्ती

मुंबई दि.३१ राज्यातील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच सत्तेत सहभागी असणा-या शिवसेनेने सामनाच्या संपादकियमधून सरकारवर आसूड ओढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची पुढील आवृत्ती दिसत आहे. राज्यातील जनता सुखी नाही, त्यांच्या मनात राज्यकर्त्यांविषयी अस्थिरता व अस्वस्थता आहे अशा तिखट शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय. त्याची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यांना कर्जमाफी द्या व कर्जमाफीची घोषणा करून तोंडाला पाने पुसू नका, असे ओरडून सांगणे यास मुख्यमंत्री विकासाला खीळ घालणे असे समजत असतील तर सरकारच्या डोक्यात ‘खिळा’ ठोकावाच लागेल असा टोलाही लगावण्यात आला आहे. विकासाला खीळ घालण्यासारखे ‘बालिश’ राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है! असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

 

 

जमतंय का बघा; नाहीतर सोडून द्या!

शिवसेनेच्या संघर्षाचा इतिहास ५१ वर्षांचा, म्हणजे भाजपच्या जन्माआधीचा आहे व शिवसेनेचे मोठेपण हे सत्तेतून आलेल्या तात्पुरत्या गालगुंडात नसून ते स्वाभिमानात व संघर्षात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय. त्याची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यांना कर्जमाफी द्या व कर्जमाफीची घोषणा करून तोंडाला पाने पुसू नका, असे ओरडून सांगणे यास मुख्यमंत्री विकासाला खीळ घालणे असे समजत असतील तर सरकारच्या डोक्यात ‘खिळा’ ठोकावाच लागेल. विकासाला खीळ घालण्याइतके ‘बालिश’ राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है!

महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला तीन वर्षे झाली आहेत हे सरकारने वृत्तपत्रात दिलेल्या लाखो रुपयांच्या जाहिरातींवरून समजले. सरकारला तीन वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मोठय़ा मुलाखती दिल्या आहेत. त्यात सरकारी ध्येयधोरणे, भविष्याचा दृष्टिकोन यावर बोलण्यापेक्षा शिवसेनेवर टीका करून व धमक्या देऊन तिसरा वाढदिवस साजरा करायचा असे ‘सरकार’ म्हणविणाऱयांनी ठरवलेच असेल तर आम्ही त्यांना त्या कामीही शुभेच्छाच देत आहोत. वाढदिवसाच्या दिवशी तरी शुभ बोलावे असे हिंदुत्वाचे रीतिरिवाज व संस्कृती आहे व संघ परिवारात पालन-पोषण झालेल्यांनी तरी या संस्कृतीचे भान राखायला हवे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, अखंडतेवर आणि स्वाभिमानावर तुळशीपत्र ठेवून कुणाला राज्य करायचेच असेल तर तो त्यांचा दोष आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची पुढील आवृत्ती दिसत आहे. राज्यातील जनता सुखी नाही, त्यांच्या मनात राज्यकर्त्यांविषयी अस्थिरता व अस्वस्थता आहे. विकासाचे नाव नाही आणि याचे खापर मुख्यमंत्री फक्त शिवसेनेवर फोडत असतील तर विकासच नाही तर राज्यकर्त्यांच्या मानेवरील खोपडीचेही ‘गांडो थयो छे!’ असे म्हणावे लागेल. शिवसेनेने विकासाला खीळ घातली असे मुख्यमंत्री सांगतात. मग शिवसेना विकासाला खीळ घालत असताना मुख्यमंत्री म्हणून आपण काय करीत होता? राज्याच्या विकासाला खीळ घालणारे कोणीही असोत, त्यांच्या वाऱयालाही मुख्यमंत्र्यांनी उभे राहू नये असे आमचे स्पष्ट मत आहे. आधीच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घातली. आधीचे सरकार भ्रष्ट व नालायक होते. आधीचे सरकार कोडगे होते. त्यांच्याकडून काही भले होईल अशी अपेक्षा जनतेला नव्हती, असे तिसऱया वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मग अशा कोडग्या, नालायक, भ्रष्ट लोकांबरोबर

 

Previous articleसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे ३६ दिवसांचे वेतन कापणार
Next articleभाजपला सत्तेत आणणारे बाहेर, आणि राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here