भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, आणि राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे

भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, आणि राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे

धुळे दि.३१ भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वपक्षावर निशाणा साधला आहे.ज्यांनी पक्ष वाढीवासाठी आयुष्य घालवले आणि सत्ता आणली, असे नेते सध्या पक्षाबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारखे ‘त्यागी’ नेते पक्षामध्ये येत आहेत, अशा शब्दात खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.

धुळे येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केलो.यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते.ज्यांनी आयुष्य पक्षामध्ये घालवले, ज्यांनी सत्ता आणली ते सध्या बाहेर आहेत आणि नारायण राणेंसारखी ‘त्यागी’ माणस आतमध्ये. मी मुद्दामहून श्याम जाजू यांच्यासमोर बोलतोय.”असे म्हणत खडसे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची आवृत्ती
Next articleकाँग्रेसच्या “जनआक्रोश” मेळाव्यांना अहमदनगरमधून सुरूवात होणार