शासकीय रुग्‍णालयांत वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यास १०४ क्रमांकवर तक्रार करा

शासकीय रुग्‍णालयांत वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यास १०४ क्रमांकवर तक्रार करा

मुंबई, दि. ३१ यापुढे वैद्यकीय उपचारासाठी  प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामीण व उपजिल्‍हा रुग्‍णालयात गेल्यास त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यास आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण याची तक्रार करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या १०४ क्रमांकांवर तक्रार केल्यास या केंद्राच्या माध्यमातून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना त्‍वरीत रुग्णालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले जाणार आहे. उद्यापासून बुधवार पासुन राज्यभर ही सुविधा सुरू होत आहे.

शासकीय रुग्णालयस्‍तरावर गंभीर रुग्‍ण उपचारासाठी येत असतात. अशा वेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध नसल्‍यास रुगणांची गैरसोय होते. त्‍यांना वेळेत उपचार मिळत नाही. अशा परिस्थितीत नातेवाईकांना कोणाशी संपर्क करावा हे सुचत नाही. याची दखल घेत आरोग्य विभागाने १०४ (टोल फ्री) क्रमांक सुरू केला आहे. आरोग्‍य सल्‍ला संपर्क केंद्रात तक्रार दाखल होऊन रुग्‍णाच्या नातेवाईकांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात येतील. जर वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क न झाल्‍यास त्‍या तालुक्‍यातील तालुका आरोग्‍य अधिकाऱ्यास व त्‍यापश्‍चात जिल्‍हा आरोग्‍य अधिकाऱ्यास सदर तक्रारीचे निवारण करण्‍याबाबत कळविण्‍यात येईल.

आपत्‍कालीन परिस्थितीत पहिला अर्धा तास हा अमुल्‍य  असतो. सदरील कालावधीत रुग्‍णांवर उपचार झाल्‍यास त्यांना होणारा त्रास, मृत्‍यूदर कमी होण्यास मदत होईल.जेणेकरुन रुग्‍णांचा सार्वजनिक आरोग्‍य सेवेवरचा विश्‍वास अधिकाधिक दृढ  होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी सांगितले.या सुविधेमुळे वैद्यकीय अधिकारी जवळच उपलब्‍ध असल्‍यास त्‍वरीत उपचार करण्‍यात येईल व ज्‍या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध होऊ शकणार नाही समजा वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणासाठी अथवा बैठकीस गेले असल्‍यास रुग्‍णाला वैद्यकीय अधिकारी उपलब्‍ध असलेल्‍या नजीकच्‍या आरोग्‍य केंद्रात संदर्भित करण्‍यात येईल.

 

Previous articleमराठा समाजातील तरुणांना त्वरित कर्ज वाटप करा
Next article७ नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस” साजरा करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here