७ नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस” साजरा करणार

७ नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस” साजरा करणार

मुंबई दि. ३१ भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साता-यातील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता.आता हा दिवस संपूर्ण राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याचा प्रमुख कार्यक्रम येत्या ७ नोव्हेंबरला सातारा येथे प्रतापसिंह हायस्कूल मध्ये होणार आहे.यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या शाळेला ५ लाखाचा निधी देण्यात येवून आजी, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर वकृत्व , निबंध स्पर्धा इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील सर्व शाळा , वसतीगृहात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

Previous articleशासकीय रुग्‍णालयांत वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यास १०४ क्रमांकवर तक्रार करा
Next articleममता बॅनर्जी उध्दव ठाकरेंची भेट घेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here