ममता बॅनर्जी उध्दव ठाकरेंची भेट घेणार
मुंबई दि. ३१ तृणमूल काॅगेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई भेटीवर आल्या असून, त्या आज रात्री उशीरा किंवा उद्या शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काॅग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे आज सायंकाळी मुंबईत आगमन झाले आहे. तीन दिवसाच्या मुंबई भेटीत त्या शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हि भेट मातोश्री निवासस्थानी किंवा महापौर बंगल्यावर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी याला कडाडून केला होता.त्य वेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून विरोध पक्षाला साथ देण्याची विनंती केली होती. बॅनर्जी आणि ठाकरे यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार हे गुलदस्त्यात असले तरी ममता बॅनर्जी यांच्या भाजपच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेला साथ देण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. येत्या ३ नोव्हेंबरला त्या मुंबईतून परदेश दो-यावर रवाना होणार आहे.