नारायण राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुंबई दि.३१ राज्यात भाजपाची सत्ता आणणारे सत्तेबाहेर आणि त्यागी नारायण राणे सत्तेत अशा शब्दात आपली खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या नंतर रालोआमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तीन वर्षे यशस्वीपणे सरकार चालवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
आज फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी ट्विटकरून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. राणे यांनी ट्विट करताना भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेला डिवचले आहे. तीन वर्षे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालवले.त्यामुळे शिवसेनेला आता नाकच राहिले नाही.मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा असेही राणे यांनी या ट्विटमध्ये नमुद केले आहे.