राज यांचे व्यंगचित्रातून “मोदींवर” फटकारे
मुंबई दि.३१ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे.
अमित शहा यांच्या पाठून पंतप्रधान आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना उद्देशून ” काय, पटतंय का माझं मत ” ? असे म्हणत असल्याचे तर कार्यकर्ते भयभीत असल्याचे दर्शविले आहे. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रूजवणे गरजेचे आहे या बातमीचा आधार घेत भाजपवर निशाणा साधला आहे.