खा.सुप्रिया सुळेंचा “सेल्फी विथ खड्डा”

खा.सुप्रिया सुळेंचा “सेल्फी विथ खड्डा”

पुणे दि.१ १५ डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा करणा-या सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत खा. सुळेंनी सेल्फी काढून ट्वीटरवर पोस्ट केले आहेत. या ट्वीटमध्ये खा. सुळेंनी लिहिले आहे,

#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat. @ChDadaPatil”

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत डेडलाईन दिली आहे. राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा पाटील यांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंच्या या ‘सेल्फी विथ खड्डे’ला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Previous articleराज यांचे व्यंगचित्रातून “मोदींवर” फटकारे
Next articleकृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास  १५ दिवसाची मुदतवाढ