शिवसेनेची स्वबळाची तयारी; आज झाली बैठक
“भाजपच्या घोटाळेबाज मंत्र्यांचे पुस्तक ”
मुंबई दि. १ सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही . आज तर शिवसेनेने थेट भाजप मंत्र्यांना लक्ष्य केले आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मंत्रांवर जे जे घोटाळ्याचे आरोप झाले .त्या मंत्र्यांवर काढलेली पुस्तिकाच सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे . राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्राथमिक तयारीसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आज बैठक आयोजित केली होती .या बैठकीला आमदार खासदार यांच्यासह सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख उपस्तिथ होते .
आगामी लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून शिवसेनेने ही तयारी सुरु केली आहे . या दृष्टीने या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले . तसेच उद्धव ठाकरे यांनी थेट पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मंत्र्यांवर झालेल्या आरोपांवर आधारित पुस्तिकाच उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिल्याची माहिती मिळत आहे . या पुस्तिकेत शिक्षण मंत्री विनोद तावडे , माजी महसूलमंत्री मंत्री एकनाथ खडसे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मंत्र्यांची छायाचित्र ही प्रदर्शित करण्यात आली आहेत . या पुस्तिकेत केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील भाजप नेत्यांवर झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांचाही उल्लेख करण्यात आला आहे .