उध्दव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट
मुंबई दि.२ तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काॅग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काॅग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. ही भेट मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये दुपारी झाली.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्रातील उद्योगपतींशी गाठी भेटी घेवून चर्चा करत आहेत. आज उद्धव ठाकरे याच्याशी भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी नंतर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावेळी या दोघांची फोनवरुन चर्चाही झाली होती.गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणती चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काॅग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही आज बॅनर्जी यांची भेट घेतली.