आगामी निवडणूकीत अजित पवार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?
अहमदनगर दि.३ राज्यात दोन वर्षा नंतर मोठे परिवर्तन होणार आहे.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येवून ,अजित पवार त्याचे नेते असतील असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केला आहे. मुंडेंच्या वक्तव्यामुळे अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा असतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंडे म्हणाले, राज्यातील भाजप सरकार हे थापा मारून व लोकांना मोठमोठी आश्वासन देऊन सत्तेत आले आहे.लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविले त्यामुळे राज्यात व देशात भाजप सत्तेवर आले.मात्र,लोकांना आता या दोन्ही सरकारचे खरे रंग दिसू लागले आहेत.आमच्या नेत्यांवर मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले.मात्र,केंद्रात व राज्यात यांचे सरकार असतानाही आमच्या नेत्यावरील ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत.आमच्याविरोधात फक्त वातावरण तापवून भाजपने सत्ता हस्तगत गेली.मात्र, आता जनतेला हे सर्व समले असल्याने २०१९ साली राष्ट्रवादी सत्तेत येईल व त्याचे नेते अजित पवार असतील असे स्पष्ट केले.