पोलिसांच्या आहार भत्यात भरीव वाढ
मुंबई दि. ३ तब्बल सहा वर्षानंतर पोलीसांच्या आहार भत्त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेवून पोलीसांना महत्वपूर्ण भेट दिली आहे.
अनेक वर्ष राज्यातील पोलीसांना तुटपुंज्या आहार भत्त्यावर समाधान मानावे लागत होते. सहा वर्षांनी म्हणजे २०११ नंतर प्रथमच आहार भत्ता वाढविण्यात आला आहे. आज जाहिर करण्यात आल्यानुसार पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना आता ७०० रूपयां ऐवजी १ हजार ३५० रूपये तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक आणि फोटोग्राफर यांना आता ८४० रूपयांऐवजी १ हजार ५०० रूपये भत्ता दिला जाणार आहे.
© Mumbai Nagri Designed by
Tushar Bhambare +91 9579794143