लंडनमधील वर्ल्ड ट्रेड मार्ट मेळाव्यात महाराष्ट्रातील पर्यटनविषयक प्रदर्शन

लंडनमधील वर्ल्ड ट्रेड मार्ट मेळाव्यात
महाराष्ट्रातील पर्यटनविषयक प्रदर्शन

मुंबई, दि. ३ लंडन येथे ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ट्रेड मार्ट या पर्यटन व्यवसायविषयक प्रदर्शनात महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, येथील संस्कृती आदींविषयक माहिती देणारे कँपेन राबविले जाणार आहे. यासाठी तिथे स्टॉल उभारण्यात येणार असून महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ या प्रदर्शनात सहभागी होत असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

वर्ल्ड ट्रेड मार्ट यांच्यामार्फत दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यात जगभरातील विविध देश सहभागी होतात. भारताचाही यात दरवर्षी सहभाग असतो. देशातील विविध राज्यांमार्फत तिथे स्टॉल तसेच कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत यंदा स्टॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळे, वन पर्यटन, हेरिटेज पर्यटन, किल्ले पर्यटन, मुंबई शहराची हेलिकॉप्टर सफर आदींची माहिती दिली जाणार आहे. राज्यातील पारंपारिक नृत्य, कला आदींचेही या प्रदर्शनात सादरीकरण होणार आहे. राज्यातील पर्यटन स्थळे, कला, संस्कृती, ऐतिहासिक महत्व देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

Previous articleराज्य कर्जबाजारी असताना सरकारची मात्र फक्त जाहिरातबाजी
Next articleदेवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here