मुंबई नगरी टीम
औरंगाबाद । नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज एक गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही पहिल्या यादीत माझे नाव होते पण ऐनवेळी ते कापण्यात आले असे त्यांनी सांगून माझे नाव का कपलं हे त्यांना विचारू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत स्थान मिळाले नसले तरी दुस-या विस्तारात मंत्री असेन असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.ज्यानी उठावात साथ दिली त्यांना विस्तारात मंत्री बनवले.आता दुसरा विस्तार होईल त्यात मला स्थान देण्यात येईल,असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही माझे पहिल्या यादीत नाव होतं पण ऐनवेळी का कापलं असेही ते म्हणाले.पहिल्या यादीत माझे नाव होते पण काही कारणे असतील त्यामुळे विस्तारात स्थान देण्यात आले नसेल मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला असल्याने पुढच्या विस्तारात मी मंत्री असेन असेही ते म्हणाले.मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. त्यात प्रामुख्याने आमदार संजय शिरसाट यांचे नाव होते पण त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.याबाबत मी नाराज नाही असा खुलासा शिरसाट यांनी केला होता.