देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस
नाना पाटेकरांची स्तुतीसुमने
मुंबई दि.४ देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे, असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे अशा शब्दात प्रसिध्द चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. पण मी भाजपाचा प्रवक्ता नाही हे सांगण्यासही नाना विसरले नाहीत.
मुंबईतील व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी त्यांच्या शैलीत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.माझा कोणत्याही पक्षाशी संबध नाही अथवा मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी शिवसेनेचा नाही, भाजपचा नाही. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे. मी परवा त्यांची मुलाखत पाहत होतो, अगदी शांतपणे आपण राज्यात काय काय केले, कुठे चुकलो, अगदी साध्या सरळ पद्धतीने सांगितले. यामध्ये त्यांनी काहीही लपवले नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे, असे मला वाटते असे नाना म्हणाले.
जनतेच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे, असा विचार राजकारणात येण्यामागे असावा, मात्र आताचे राजकारणी हा विचार कुठे करतात, असा सवाल नानांनी उपस्थित केला. गेल्या ५० वर्षे एवढ्या कलाकारात मी कसा टिकलो, तर ते माझ्या चेहऱ्यामुळे, नाही तर तर माझ्या विचारांनी. क्रांतिवीर सिनेमातील हिंदू- मुस्लिम बाबतचा डायलाॅग हा विचार होता, तो कधीच संवाद नव्हता, असे नानांनी स्पष्ट केले.