फेरीवाला आंदोलनानंतर राज ठाकरे काय बोलणार ?
आज प्रथमच मांडणार भूमिका
मुंबई दि.४ एल्फिस्टन रोड रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई आणि उपनगरात मनसेने सुरु केलेल्या आंदोलनानंतर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदा आपली भूमिका मांडणार आहेत. रंगशारदामध्ये आयोजित केलेल्या पदाधिकारी मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना झालेली मारहाण , काॅग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी मनसेला दिलेले आव्हान, या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रथमच आज ६:३० वाजता रंगशारदा येथे आयोजित केलेल्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत . फेरीवाला आंदोलनाच्या पडसादानंतर राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दादर रेल्वे स्टेशन बाहेर काॅग्रेसने काढलेला फेरीवाला समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाले मनसेच्या सैनिकांनी केलेला विरोध या सर्व ताज्या घटनाक्रम नंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांपुढे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. या मेळाव्याला राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.